शुभ्रा आधार फाउंडेशन या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने जीवन अंकुर बाल आश्रमाची स्थापना २९ मार्च २०१९ रोजी मु.पो. साळुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे येथे करण्यात आली.
महाराष्ट्रातील अनाथ, निराधार, ऊसतोड मजुरांची मुले, आदिवासी व गरीब कुटुंबातील मुला-मुलींना आश्रमात प्रवेश दिला जातो. येथे राहण्याची व जेवणाची सोय, शालेय शिक्षण, शैक्षणिक साहित्य आणि वैद्यकीय सेवा पूर्णतः मोफत पुरवली जाते.
ग्रामीण भागातील इतर मुलांनाही शालेय साहित्य व शिक्षणासाठी संस्था मदत करते. आतापर्यंत ७०–८० हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेकडून शिक्षणासाठी मदत मिळाली आहे. तसेच प्रत्येक सण, जयंती, उत्सव, योग दिन, शिक्षक दिन, बाल दिन आणि महिला दिन आश्रमात साजरा केला जातो.

आमचे स्तंभ